सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती

                                                                                                                                                                                                                       *सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना*

*SARAL Online.com*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना विद्यार्थी फॉर्म  आँनलाईन भरायचे आहेत . त्या करीता www.etribal.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन अ.ज. विद्यार्थीची माहीती भरायची आहे* .

*त्या करीता principle login वर जाऊन शाळेची profile update करुन घ्यावी .आपल्या शाळेतील ST विद्यार्थी संख्या नोंदवावी. Principal login चा युझर नेम Plयु डायस कोड (example Pl27211115301) व Password Pass@1234 आहे. Pl लॉगीन वर ck लॉगीन वरून फॉर्म भरल्यानंतर फॉर्म वेरीफिकेशन करायचे आहेत*

*त्या नंतर विद्यार्थीची माहिती भरण्यासाठी ck login चा वापर करावा . ck login चा युझर नेम Ck युडायस कोड (example Ck27211115301) व Password Pass@1234 आहे. Ck login वर जाऊन विद्यार्थीचि आँनलाईन माहिती जतन करायची आहे . अर्ज अचूक भरलेले हे तपासले कि त्याचे print काढावे व अर्ज forward करावा*.

*ह्या योजनेस पात्र विद्यार्थी*

१)*इयत्त १ ते १० आदिवासी संवर्गातील मुले – मुली (ST)*
२)*मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाण पत्र*
३)*पालकांचे उत्पन्न १.०८ लाख पेक्षा कमी असल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र*
४)*विद्यार्थी सरासरी हजेरी ८०% पेक्षा अधिक असावी*

*प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*

१)तलाठी याचा उत्पन्न दाखला
२)विद्यार्थी व वडिलांचा रहिवासी दाखला ( ग्रामसेवकाने दिलेला )
३)विद्यार्थी आधारकार्ड
४)विद्यार्थ्याचा राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या खात्याची झेरोक्स प्रत ( खाते शक्यतो विद्यार्थ्याचे असावे किंवा आई व वडील यांचे संयुक्त खाते असावे
५)दोन पासपोर्ट साईज फोटो
६)तीन पाल्य असल्यास फक्त दोन पाल्यांच्या लाभ घेणे बाबत पालकांचे स्वलिखित प्रतिज्ञापत्र
७)मागील परिक्षेच्या निकालाची प्रत.
८)विद्यार्थी बोनाफाईड दाखला
९)पालकांचे जातीचा दाखला
१०)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाण पत्र

*मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी कडून अर्ज पडताळणी करून संमती प्रमाणपत्र प्रस्तावास जोडावे*                                                                                                                                  

6 comments:

  1. माहितीबद्दल धन्यवाद सर ....!

    ReplyDelete
  2. सर ही शिष्यवृत्ती आश्रम शाळेतील मूळ मुलींना पण असते का?

    ReplyDelete
  3. सर मला शिष्यवृत्ती चा नमुना हवा आहे... सुवर्ण महोत्सवी योजना विद्यार्थ्यांचा फॉर्म भरायचा

    ReplyDelete
  4. सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ 1 ली ते 7 वी च्या विध्यार्थ्यांना देत असताना विशेषत: इयत्ता पहिली ते चौथी मधील काहीवेळा पहिली ते सातवी मध्ये शिकत असलेल्या विध्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध नसतात, परंतु ग्राम विकास विभागाच्या दिनांक 17 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रं 4.10 मुळे आदिवासी विध्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देताना अडचणी येत आहेत. यासाठी शासनाने काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत काय? असल्यास कृपया ब्लॉगवर टाकावे ही विनंती.

    ReplyDelete