क्यू आर कोड


*QR कोड बनवायचा कसा?* आणि *वापरायचा कसा?

इयत्ता सहावीच्या पाठयपुस्तकामध्ये qr कोड आलेले आहेत.सोलापूर जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक श्री रणजितसिंह डिसले यांनी ते तयार केले आहेत.लवकरच बालभारतीची सर्व पुस्तके Qr Code स्वरूपात येणार आहेत.हा Qr कोड कसा असतो? त्याचे कार्य काय? तो कसा वापरायचा असे नानाविध प्रश्न आपणासमोर पडले असतील...  Qr कोड तयार करण्यासाठी वेगवेगळ्या website उपलब्ध असून काही websites मोफत Qr कोड तयार करण्याची सुविधा प्रदान करतात.

*सुरुवातीला आपण Qr code चे काय फायदे आहेत ते जाणून घेऊ या.

*१)माहिती साठविण्याचं उत्तम माध्यम म्हणून Qr कोड कडे पाहिलं जात.
*२) ही माहिती kb मध्ये साठविली जाऊन आपल्याला सांकेतिक इमेज स्वरूपात save करता येते.
*३)कुठेही कधीही आपण ती इमेज ओपन करून माहिती वाचू शकतो.
*४)निरनिराळया website किंवा महत्वाची माहिती यामध्ये save करता येते.

Google play store वर जर का तुम्ही गेलात तर Qr code संदर्भात निरनिराळे अँप्स उपलब्ध आहेत.
त्यातील  Qr droid हे एक वपरण्यासाठी सोपे अँप् आह.
या अँप्स ची माहिती खालील प्रमाणे

*⭕Qr Droid

*याच्या साहाय्याने तुम्हाला कोणताही Qr कोड स्कॅन करून त्यातील मजकूर वाचता येतो.*

*निरनिराळे वेब ऍड्रेस, ब्लॉग लिंक,टेक्स्ट स्वरूपातील माहितीचे Qr कोड आपण याच्या साहाय्याने बनविता येतात.

*कॉन्टॅक्ट, business कार्ड याचे Qr कोड बनविता येतात.

*अँप्स च्या लिंक आपणास save करून ठेवता येतात.

*Qr कोड ला design करता येते.रंगसंगती मनाप्रमाणे देता येते.

*तयार झालेला Qr कोड नावानिशी save करता येतो.

*या अँप्सची लिंक खाली देत आहे त्यावरून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता.

No comments:

Post a Comment