Tuesday, 17 October 2017

👍👍संख्या लेखन व वाचन👍👍

*दशगुणोत्तरी संज्ञा*

संख्येमधील प्रत्येक अंकाला एक दर्शनी किंमत असते आणि एक स्थानिक किंमत असते.

सामान्यपणे मोजमापन व्यक्त करण्यासाठी संख्यांचा उपयोग करतात. संख्यालेखन ही भारताने जगाला दिलेली बहुमूल्य देणगी आहे. संख्यालेखन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर दशमान पद्धतीने केले जाते. दशमान पद्धतीने केलेले संख्यालेखन म्हणजे १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि ० या दहा अंकचिन्हांचा उपयोग करून लिहिलेली संख्या होय.  म्हणून दशमान पद्धतीला काही जण दशचिन्ह पद्धत असेही म्हणतात.

संख्येमधील प्रत्येक अंकाला एक दर्शनी किंमत असते आणि एक स्थानिक किंमत असते. सामान्यपणे संख्यावाचन करताना अंकाच्या स्थानिक किमतीनुसार संख्या वाचन केले जाते. एकक, दशक, शतक, हजार, लाख, कोटी, … तर इंग्रजी भाषेत युनिट, टेन्स, हण्ड्रेड, थाऊजंड, लॅक्स, क्रोर्स, बिलियन, मिलियन, ट्रिलियन या दशगुणोत्तरी पारिभाषिक शब्दांचा उल्लेख होत असतो, हे आपल्याला माहीत आहेच.

अंशित एककांसाठी पिको, नॅनो, मायक्रो, मिली, सेन्टी, डेसि या दशगुणित शब्दांचा उपयोग करता येतो.  तसेच गुणित एककांसाठी डेका, हेक्टो, किलो, मेगॅ, गिगॅ, टेरॅ, पेटा, एक्झा, जेट्टा, योट्टा, इ. शब्दांचा उपयोग करून घेतला जातो. हे देखील दशगुणोत्तरी पारिभाषिक शब्द आहेत.

भास्कराचार्य (द्वितीय) यांनी लिहिलेल्या ‘सिद्धांत शिरोमणी’ या ग्रंथातील लीलावती या विभागात असलेल्या २६१ श्लोकांपकी अकरावा आणि बारावा हे दोन श्लोक आपल्याला दशगुणोत्तरी शब्दांची यादी देतात, ते श्लोक पुढीलप्रमाणे,

एकदशशत सहस्रायुत लक्ष

प्रयुत कोटय़: क्रमश: ।

अर्बुदम्ब्जं खर्व निखर्व

महपद्म शंकवस्त स्मात ।।११।।

जलिधचात्यं मध्यं परार्धमिती दशगुणोत्तरं संज्ञा ।

संख्या: स्थानानां व्यवहारार्थ कृता: पूर्वे: ।।१२।।

याशिवाय प्राचीन भारतीय ग्रंथांमध्येही दशगुणोत्तरी संज्ञा सापडतात.

‘एक (एकं), दशं (दहा), शतम् (शंभर), सहस्र (हजार), दशसहस्र (दहा हजार),  लक्ष (लाख), दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म, नील, दशनील, शंख, दशशंख, क्षिती, दशक्षिती, क्षोभ, दशक्षोभ, ऋद्धी, दशऋद्धी, सिद्धी, दशसिद्धी, निधी, दशनिधी, क्षोणी, दशक्षोणी, कल्प, दशकल्प, त्राही, दशत्राही, ब्रह्मांड, दशब्रह्मांड, रुद्र, दशरुद्र, ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशबुरुज, घंटा, दशघंटा, मील, दशमील, पचूर, दशपचूर, लय, दशलय, फार, दशफार, अषार, दशअषार, वट, दशवट, गिरी, दशगिरी, मन, दशमन, वव, दशवव, शंकू, दशशंकू, बाप, दशबाप, बल, दशबल, झार, दशझार, भार, दशभार, वज्र, दशवज्र, लोट, दशलोट, नजे, दशनजे, पट, दशपट, तमे, दशतमे, डंभ, दशडंभ, कैक, दशकैक, अमित, दशअमित, गोल, दशगोल, परिमित, दशपरिमित, अनंत, दशअनंत.’

दशअनंत म्हणजे एकावर शहाण्णव शून्ये

कोकणा आदिवासी जमाती

ओळख - "कोकणी/कोकणा" ही एक
आदिवासी जमात आहे.
ही जमात भारताच्या महाराष्ट्र राज्यात नंदुरबार, धुळे,
नाशिक
व ठाणे जिल्ह्यात व गुजरात राज्याच्या सुरत व तापी
जिल्ह्यात
राहते. नंदुरबार व धुळे व गुजरात मध्ये 'कोकणी' असे
संबोधले
जाते नाशिक व ठाणे जिल्ह्यात 'कोकणा' असे संबोधतात.
वस्ती व निवास व्यवस्था ही मुख्यत्वे
करून डोंगरपठार,
नदीनाला जवळ आढळून येते. कोकणी/
कोकणा जमातीचा पुर्वीपार
स्वतंत्र अस्तित्व असून कोणत्याही इतर
जमातीची उपजमात
नाही. व कोकणी/कोकणा
जमातीची
कोणतीही उपजमात नाही.
कोकणी/कोकणा जमातीचा मुख्य व्यवसाय
'शेती' असून 'उत्तम'
प्रकारे शेती करतात. जोड व्यवसाय म्हणून पशुपालन
(गायी,
म्हैशी, बक-या), कुकूटपालन काही जण
सुतारकाम सुध्दा करतात.
तसेच जंगलात महुफुले, ठोळमी गोळा करणे व इतर
पदार्थ देखील
गोळा करतात.
कोकणी/कोकणा जमातीचा पेहराव
स्त्रीया लाल रंगाची व
त्यावरकाळ्या व पांढ-
या रंगाच्या ठिबक्यांची
"फडकी" (ओढणी), चोळी,
खांडवा (नऊवारी लुगडा) तर पुरूषांचा पेहराव डोक्याला
'पागोटा'
किंवा 'टोपी' अंगात बंडी, कंबरेला 'धोतर' असा
असतो.
प्रदेशानुसार स्त्रीयांची
ओढणीत थोडे बदल आढळतात.
ही जमात सह्याद्री पर्वत रांगेच्या
कुशील
राहणारी होती कालांतराणे दुष्काळामुळे
अन्नाच्या शोधात
स्थलांतरीत झालेली आढळते. ह्या
जमातीचा इतिहासात 'मावळे'
म्हणून उल्लेख आढळतो. (मावळे काटक व माळराणावर राहणारे
हातावर भाकर, ठेचा घेऊन खानारे.... आज देखील
कोकणा/
कोकणी जमातीतील लोक
काटक, शेतात काम करतांना हातावर
भाकर घेऊन खातात) जिवा महाला हा शेतकरी होता,
त्याला दांडपट्टा उत्तम चालवता येत होते.... आज
देखील
ह्या जमातीकडे तलवार, भाला, ढाल आदी
साहित्य आढळून येते.
कोकणी/कोकणा जमातीची
'कोकणी' ही भाषा आहे. नंदुरबार
जिल्ह्यात 'बुंधाडी', धुळे जिल्ह्यात
'घाटली' (घाटावरील) तर डांग
भागात 'डांगी' (गुजराती भाषेचा प्रभाव आहे)
नाशिक व ठाणे
जिल्ह्यात 'कोकणा' (मराठी भाषेतील
काही शब्द) बोलली जाते.
प्रदेशानुसार भाषा बदलत जाते. कोकणी भाषेत
मराठी, हिंदी,
गुजराथी भाषे मधील काही
शब्द वापरले जातात
कोकणी/कोकणा जमातीचे मुख्य सण
पंचमी, पोळा, सर्वपित्री,
दिवाळी, दसरा, उतराण, होळी,
आखात्री, खांब/पाटली पुजन,
घाटा, शिवा-या, वाघदेव व डोंग-यादेव, घट्यादेव हे उत्सव
आनंदाने साजरे करतात. तसेच विवाह, पाचवा, जाऊळ,
उत्तरकार्य इत्यादी सोपस्कर पारपाडले जातात.
कोकणी/कोकणा जमातीमध्ये 'एक
पत्नीत्व' समाज
व्यवस्था तसेच विधवा विवाह समाजाला मान्य असून
'एकत्रीत'
व 'विभक्त' कुटूंब पध्दीत असे दोन्ही
व्यवस्था आहेत. एकाच
कुळात लग्न करीत नाही किंवा इतर
समाजात व जमाती मध्ये
देखील करत नाही. ह्या
जमाती मध्ये ५० च्या आसपास कुळ/
आडनावे आहेत.
कोकणी/कोकणा जमातीमध्ये
कणी-कंसरा, महादेव, पार्वती,
विष्णू, लक्ष्मी, कृष्ण, हनुमंत,बहिरम देव, खंडेराव,
पांढरमाता,
'कार्तीक स्वामी (डोंग-यादेव)'
इत्यादी देवी देवतांना पुजले जाते.
तसेच ह्या जमाती मध्ये भगत व डाकीण
ह्या प्रथा देखील रूढ
आहेत.
कोकणी/कोकणा जमातीमध्ये
स्त्रीया गळ्यात चांदीची
साखळ,
हासळी, सोन्याच्या पुतळ्यांचा हार, डोरलं, व
रंगबेरंगी मन्यांचे
हार, पोवळ्यांचा हार घालतात. दंडात चांदीचा कडा, येल्या,
येली,
हातात कंकण, नाकात फुली, कानात बाळ्या, पायात पैंजन
तसेच
सौभाग्याच लेनं गळ्यात मंगळसुत्र, डोरलं, पायात जोडवे
वापरतात. पुरूष कानात कुडक्या, मनगटात चांदीचा वाळा,
कंबरपट्टा इत्यादी दागीने वापरतात.
कोकणी/कोकणा जमातीचे विविध
कार्यक्रमांच्या व
सणाच्या वेळी संबळ व सनई, डफ,
पावरी,चिरक्या, तुर-
काश्याची थाळी, डफली
इत्यादी वाजवीतात.
शेवटी, कोकणी-कोकणा बांधवांना हिच
विनंती कि हा संदेश जास्तीत जास्त
आपल्या बांधवांपर्यंत पोहचवा जेणेकरुन आपल्या
समाजाची ज्यांना तोंडओळख नाही त्यांना
ओळख तर होईल !!

💐शालेय अभिलेखे 💐

शालेय अभिलेख .
शाळा स्तरावर ठेवावयाचे अभिलेखेप्रत्येक अभिलेख मुख्याध्यापकांनी खालीलप्रमाणे प्रमाणीत करावा.प्रमाणपत्रप्रमाणीत करण्यात येते की सदरहू रजिस्टर मध्ये क्रमांक १ ते ....... इतकीपृष्ठे आहेत.मुख्याध्यापक स्वाक्षरी व शिक्का
विद्यार्थी संदर्भातील अभिलेखे
१ जनरल रजिस्टर
२. पालकांचे प्रतिज्ञा रजिस्टर
३. विद्यार्थी हजेरी
४. शाळा सोडल्याचे दाखले फाईल
५. उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर
६. सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन नोंदवही
७. विद्यार्थी प्रगतिपत्रक
८. संचयी नोंदपत्रक
९. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फाईल
१०. आदिवासी स्वर्णजयंती शिष्यवृत्ती
११. अस्वच्छ कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
१२. मोफत गणवेश / लेखन साहीत्य वाटप रजिस्टर
१३. पाठ्यपुस्तके / स्वाध्यायपुस्तिका वाटप रजिस्टर
१४. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना रजिस्टर
१५. शालेय पोषण आहार दैनिक नोंदवह्या
१६. विद्यार्थी आरोग्य तपासणी रजिस्टर व शोधपत्रिका
१७. अपंग विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
१८. विद्यार्थी उपस्थिती, दैनिक गोषवारा रजिस्टर
१९. अल्पसंख्याक विद्यार्थी पटसंख्या रजिस्टर
२०. शालेय मंत्रीमंडळ सभा नोंदवही
मुख्याध्यापक व शिक्षक संदर्भातील अभिलेख
१.शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी हजेरी
२.शैक्षणिक साहीत्य नोंद रजिस्टर
३.ग्रंथालय पुस्तक देवघेव रजिस्टर
४.मुख्याध्यापक लोगबूक
५.सूचना वही
६.शैक्षणिक साहीत्य देवघेव रजिस्टर
७.शिक्षक वैयक्तिक माहिती फाईल
८.शिक्षक रजा फाईल ( नैमित्तिक व दिर्घ्र रजा)
९.शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर
१०.पटनोंदणी सर्वेक्षणरजिस्टर
११.पालक भेट रजिस्टर
१२.परिपाठ \ सहशालेय उपक्रम नोंदवही.
१३.आकाशवाणी \ दूरदर्शन \ आधुनिक तंत्राबाबत कार्यक्रम रजिस्टर.
१४ .ग्रंथालय नोंदवही.
१५.उशिरा येणाऱ्या शिक्षक \ कर्मचाऱ्याकरिता नोंदरजिस्टर \ लेट मस्टर .
१६.सेवापुस्तिका .
१७.गोपनीय अहवाल.
१८. खेळाच्या साहित्याची नोंदवही.१९. माझी समृद्ध शाळा श्रेणी नोंद रजिस्टर.
२०. शाळेला मिळालेल्या परितोषिकाचे नोंद रजिस्टर.
२१. नियतकालिक वितरण पत्रकाची नोंदवही.
२२. नेमणूक, बदली झालेल्या शिक्षकांचे कार्यमुक्ती ,रुजुअहवालनोंदवही.
२३. प्रकरनिका नोंदवही (विभागीय चौकशी ,लोक आयुक्त प्रकरण इ.)
२४. न्यायालीयन पत्रव्यवहार नोंदवही.
२५. भ.नि .नि. नोंद रजिस्टर (भविष्य निर्वाह निधी)
२६.आयकर विवरणपत्र / व्यवसायकर फाईल.
२७. बिंदुनामावली (रोस्टर )
२८. माहिती अधिकार बाबत फाईल.२९. आवक- जावक रजिस्टर
.३०. शालेयसमिती इतिवृत्त रजिस्टर (खा. व्यवस्थापनाचे शाळांकरिता)
३१. शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त रजिस्टर
३२. माता- पालक संघ इतिवृत्त रजिस्टर.
३३. शिक्षक–पालक संघ इतिवृत्त रजिस्टर.
३४. पदभार (चार्ज ) देवघेव रजिस्टर (चार्ज रजिस्टर)
३५. शाळा विकास आराखडा फाईल .
३६. जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली (U-DISE) प्रपत्र.३७. शासकीय आदेश \ परिपत्रक फाईल .३८. अभिप्राय रजिस्टर ( अधिकारी ) (अ).३९. अभिप्राय रजिस्टर (पदाधिकारी) (ब )
४०. हालचाल रजिस्टर ( शिक्षक \ मुख्याध्यापक \ कर्मचारी)
४१. वार्षिक तपासणी \ शाळा तपासणी अहवाल फाईल .
४२. मासिक अहवाल फाईल .
४३. शिक्षक \ मुख्याध्यापक संचिका.
४४. शिक्षक सहविचार सभा
रजिस्टर.
वित्तीय संदर्भातील अभिलेख.१1)जमाखर्च व पावती फाईल
अ)जमाखर्च नोंदवही.
ब) पावती फाईल.
क) दरपत्रके(कोटेशन) फाईल .
द) स्टोक बुक नं.३२.
इ) स्टोक बुक नं. ३३.ई) बँक पासबुक \ चेक पुस्तिका.प) चेक \ धनादेशनोंद रजिस्टर.फ) लेर (खतावणी)
४५. स्थावर मालमत्ता रजिस्टर (प्रोपटी फाईल )
४६. पगारपत्रकफाईल.
४७. वेतनेतर फाईल .
२) सर्व शिक्षा अभियान अनुदानअ) जमाखर्च नोंदवही.आ) लेजर रजिस्टर (खतावणी )इ) पावतीफाईलई) दरपत्रके (कोटेशन) फाईल.उ) स्टोक बुक नं.
३२.ऊ) स्टोक बुक नं .
३३ए) बँक पासबुक \ चेक पुस्तिका.ऐ) चेक \ धनादेशनोंद रजिस्टर
४८. दूरध्वनी, फक्श, संदेश , रजिस्टर .
४९. विधानसभा व विधान परिषद प्रश्ननोंद रजिस्टर.
५०. शालेय पोषण आहार वितरण
५१. शालेय पोषण आहार कामगारांचे हजेरी रजिस्टर

💐वाघ बारस💐

                      *वाघबारस*
               💐💐💐💐💐💐

          आदिवासींच्या जीवनातील पावन  दिवस म्हणजे वाघबारस . हा दिवस आश्विन महिन्यात काळोख पाखात बारशिंच्या दिवशी येतो . हा दिवस पावन  असण्याचं कारण म्हणजे याच दिवशी आदिवासींचे दैवत वघोबाचे पूजन केले जाते.  रवाल या आदिवासी शाळेचे  समापन याच दिवशी असते. याच दिवशी चार महिन्यानंतर गावठी औषध्या भगत परिपूर्ण तयार होतो. म्हणूनच आदिवासींच्या जीवनात वाघबारस या दिवसाचे विशेष महत्व आहे.

*वाघबारस आणि वाघोबा* 🌿

          *आदिवासी देवता मुख्यतः प्राणी,  वनस्पती व निसर्गातल्या घटकांवर आधारित आहेत*. त्यापैकी एक  दैवत म्हणजे वाघोबा= वाघया = वाघ्या.  आश्विन महिन्यात काळोखाच्या बारशीना वाघोबाचे जागरण  केले जाते,  म्हणूनच या बारशीना वाघबारस म्हणून ओळखले जाते.

           वाघोबा हा जंगलातील वाघांचा राजा मानला जातो. वाघोबा हा जंगलातील वाघांवर व जंगली प्राण्यांवर नियंत्रण ठेवतो असा समज आहे . वाघोबाची स्थापना पाड्याच्या शीवेवर केली जाते म्हणून काही भागात वाघोबाला गावशीवाऱ्या या नावानेही ओळखले जाते. शक्यतो वाघोबाची स्थापना वडाच्या मोठ्या झाडाखाली लाकडावर वाघाच्या चित्राचे कोरीव काम करून केली जाते. त्यावर शेंदूर लावला जातो.

           वाघबारशिंच्या दिवशी आदिवासी वाघोबा बसवलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या समोर  कोड्या लावतात. नारळ फोडून व टोलवा वाहून पूजन करतात. आणि देवाच्या पाया पडून आराधना केली जाते - 'आमचे, गव्हाऱ्यांचे,  गोजरा - ढोरानचे खाडया, जनावरांनपासून  रक्षण कर, आम्हाला चांगले पीक दे , आजारांना दूर ठेव' असा सुकदेव (सूकेसर) केला जातो.

*वाघबारस आणि रवाल* 🌿

           रवाल म्हणजे आदिवासींमध्ये पूर्वीपासून सुरु असलेले सात दिवसांचे प्रशिक्षण केंद्र होय. या ट्रेनिंग सेंटर मध्ये डोंगराच्या औषधांची ओळख व भगत खंड यांचे प्रशिक्षण दिले जाते. रवाल हि दसऱ्या पासून सुरू होते,  तर  वाघबारस या  दिवशी रवाल थापली (समापन) जाते.

           दसऱ्याच्या दिवशी आपल्या पाड्यापासून दूर डोंगरीला ओहळ किवा पानवठ्याची जागा निवडून पडाल = पलाड तयार करून रात्रीच्या वेळी झुन भगत साधारण सोळा रात्री प्रशिक्षण आपल्या चेल्यांना देतो. वाघबारशीच्या अगोदरच्या रात्री व वाघबारशीच्या दिवशी विशेष रीत केली जाते.

           काही नवीन भगत प्रशिक्षण पावसाळा सुरु झाल्यापासून सुरू होते. त्यांचा वाघबारशीपर्यंतचा प्रशिक्षण कालावधी साधारण चार महिन्यांचा असतो. *या प्रशिक्षणामध्ये आदिवासी संस्कार व आदिवासी तत्वज्ञान असलेले पुढील खंड शिकविले जातात*.

1. *महादेव खंड* : मनुष्य निर्मितीची कहाणी

2. *पालीचा खंड* : शारीरिक दुखापती बद्दल .

3. *बायांचा खंड* : महिलांसाठी कथा .

4. *मुठिचा खंड* : शरीरावरील आघातासारख्या आजार संदर्भात.

5. *कनसरी खंड* : धान्य देवतेची संस्कार कहाणी व महत्व .

          याशिवाय दोन पुढचे खंड आहेत जे प्रशिक्षणसाठी अनिवार्य नाहीत.

6. *दिस खंड*  :  दिवसकार्य संदर्भात कहाणी व रीत .

7. *जात खंड*  : पाप निवारण संदर्भात रीत व तत्व .

           या खंडाचा शब्द न शब्द लक्षात ठेवावयाचा असतो. त्यामुळे ज्याची स्मरणशक्ती चांगली तोच भगत बनू शकतो. हि शाळा पूर्णपणे तोंडी अभ्यासावर अवलंबून असते. येथे स्मरणशक्तीचा पूर्ण विकास केला जातो.

           वाघबारशीच्या अगोदरच्या रात्री व वाघबारशीच्या दिवशी तारपकरी देवांचे  चाले लावतो आणि  भगत लोक वेगवेगळ्या देवांचे वारे घेतात. घोर काठीच्या आवाजाने अधिक उत्साह निर्माण केला जातो. या वेळी *मखोलीची*  ( झेंडु ) फुले देवांना वाहिली जातात. त्यानंतरच म्हणजेच  वाघबारशीपासून  आदिवासी महिला हि फुले आपल्या केसात लावायला सुरुवात करतात. खरंतर योग्य वेळेच्या अगोदर कोवळी, अपरिपक्व फुले तोडू नये म्हणून वाघबारशीनंतर हि पक्व फुले तोडावीत हा मिळालेला आदिवासी संस्कार खुपच निसर्गप्रेमी आहे.

           रवालीत शेवटी - शेवटी तारप्यावर देव नाचतात आणि मग  आदिवासींच्या जीवनात तारप्याचा ठेका सुरु होतो. काहीजण वालूक, चवली, चिबुड, पावसाळ्यात होणाऱ्या भाज्या यांची *पाल = पालनुक* करतात. त्यांची हि पाल दिवाळीला संपते.

*वाघबारस आणि देवता पूजन* 🌿

           रवालीमध्ये सर्व देव व भूतांचा बंदोबस्त केला जातो असे मानले जाते. वाघबारशीनंतर घरचादेव - कुलदेव धुवणे  , गावदेव (देवाचा लगीन),  सात, नवीन देव बांधणी , खल्यात खलमेढ (खेडमेढ) गाड़ने, तोरनी चेडा, खाड़ीचा देव असे  देवपूजन पुढच्या काळात केले जाते. या पैकी काही रीती केल्या नंतरच लग्नाचा  नवीन लहान बोल खायला आदिवासींच्या गावात सुरुवात होते.

*काही आदिवासी दैवतांची नावे* 🌿

वाघोबा,  हिरवा=हिरवक=हिरोबा,  हिमाय=हुमाय, गिरजाय,  म्हसोबा, नारनदेव,  चेडोबा = चेढा , घोडी चेढा , तोरनी चेढा=मखरी चेढा=मकरित , गवली चेढा , वावटिचा चेढा, जगली चेढा ,  धरतरी , कनसरी, गावतरी, अस्तरी , कालीजग , सवरी=सनवरी=सोरे ,  खाडीचा देव, भरान देव , चांद , सूर्या , सुकेसर , ढगेसर , वीजेसर=विजापत , थापेसर , लीपेसर , खाचेसर , खापेसर , खांबेसर , मांडेसर , गानेसर , ऊबडेसर , गानेसर , गाजेसर , तापेसर , भोगेसर ,  सती माता , जाम्मू , चिता , चिंबाय=चीम्भी  , हलदाय , कानुदेव , टिकमदेव , परवत देव , दगडीदेव , दयीचादेव , धरना कोरी , नीरवल देव , उगवता बैगा , वंगलवा देव= वंगनाचा देव , वीर देव , वयोबादेव , झोटिंग , निमा देव , गयलायदेवी , कोतायरानी=कोतारानी , कारवसी देवी=कारवी देवी , सोनी जल , रूपा जल , पावश्या देव , वावडी वीरा , किरन मोकला , कुरती देव , गुरजा देवी , बाया , गीऱ्हा , शेंदराय , कुकवाय ,  वजराय , एकशिऱ्या .

*वाघबारस आणि आदिवासी दिवाली*

          आदिवासींच्या दिवाळी सण हा वाघबारस वरून ठरत असतो . वाघबारशिं नंतर तवरस , चवरस , आणि पुनींव असे दिवस येतात . या दिवसांत घरातील मोठी माणसे वरगना देव = कुल देव काढून दुधाने अथवा तांदुळाच्या पाण्याने धुतले जातात . तसेच देवांची टोपली शेनाने सारवली  जाते . हिरवा , हिमाय , नारन , बरान या देवांना शेंदूर लावला जातो.

           कापणीच्या मध्ये येणारा हा सण तयार पिके घेऊन येतो म्हणून आदिवासींचा हा सण  सुखाचा सण आहे .

          आदिवासींची दिवाळी तीन दिवस असते . आदिवासी दिवालीचा पहिला दिवस *चवरस* या दिवसापासून सुरु होतो , पण काही भागात आता तारखा बदलेल्या दिसतात .

*पहिला दिवस*

:-  या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळी करतात . त्यानंतर आपल्या ढोरांच्या शींगांना लाल गेरू लावला जातो . काही गावांत ढोरांची दिवाळी उडविली जाते . गोठ्यात ,  शेनकईत व खल्यात औषधी *कडू चीराड* ठेवली जातात व  चीराडाची कोड्या लावली जातात .

           या दिवशी *गोडाची भाकर* परिवारा  सोबत खाल्ली जाते . जी भाकर पीठ, वालुक = गावठी ककड़ी , चवली , साखर यापासून बनवतात . याशिवाय *चवली व करांदे*  हे  सोबत खाण्याचा कार्यक्रम असतो.

*दुसरा व तिसरा दिवस*

: -आदिवासी तरुण व तरूणी रंगबिरंगी कपडे घालून एकत्र जमून तारपकऱ्याच्या *चाल्यावर* तारपा नाचायला आपल्या पाड्यात  निघतात . आणि दोन दिवस आपल्या परिसरात *डुहूरली* करून  बेधुंद नाचतात .
           तारपकरी आपल्या तारप्यावर  वेगवेगळे चाले वाजवून घोरकाठीच्या तालावर फार मजा आणतो . प्रत्येक चाल्याचा नाच वेगवेगळा असतो .

           हे चाले वेगवेगळा नावाने परिचित आहेत. -- बायांचा चाला , देवांचा चाला ,रानोडी चाला , टाल्यांचा चाला , चवलेचा चाला , जोड्यांचा चाला , नवऱ्यांचा चाला , मोराचा = मुऱ्हा चाला , ऊसल्या चाला , सलातेचा चाला , बदक्या चाला , लावरी चाला .

🌿🌿 🐯🐯🐯🐯🐯 🌿🌿